Pune : 'शिवगर्जना' महानाट्यातून शिवप्रेमींनी अनुभवला शिवकालीन इतिहास!
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त 'शिवगर्जना' महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Photo credit : Reporter/Pune)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी,आम्ही शिवबाची चाकरं.., एक मुजरा भगव्या झेंड्याला एक मुजरा जरी पटक्याला…, युगनिर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला' अशा विविध ऐतिहासिक घोषणा, गाणी आणि पोवाड्यांच्या माध्यमातून शिवप्रेमींनी 'शिवगर्जना' या महानाट्याचा आनंदानुभव घेतला. (Photo credit : Reporter/Pune)
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Photo credit : Reporter/Pune)
आज या महानाट्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही महानाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. (Photo credit : Reporter/Pune)
देखण्या आणि भव्य मंचावर शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली. (Photo credit : Reporter/Pune)
वेरुळ, विजयनगर साम्राज्यांवर परकीयांचे आक्रमण, बाल शिवाजींचा जन्म, पन्हाळा किल्ला वेढा, आग्र्याच्या दरबारातील प्रसंग, कोंढाणा किल्ला झुंज, स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती, राज्याभिषेक यासह स्वराज्य निर्मितीच्या विविध ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. (Photo credit : Reporter/Pune)
प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. (Photo credit : Reporter/Pune)
महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसरात जणू साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ अवतरला होता. जय भवानी... जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला. (Photo credit : Reporter/Pune)
आमदार सुनील टिंगरे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Photo credit : Reporter/Pune)
'शिवगर्जना' महानाट्याचे २६ तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता आले. (Photo credit : Reporter/Pune)