Sharad Pawar Retirement: साहेब निवृत्त पदाधिकारी होतात, जनतेच्या मनातील राजे नव्हे; पुण्यात शरद पवारांना विनंती करणारे बॅनर्स झळकले
दोन ते तीन दिवसात राजीनाम्याचा फेरविचार करणार पण कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं तर शरद पवार आपला निर्णय बदलणार नाहीत असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवारांनी कालच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
पवारांच्या घोषणेनंतर संपूर्ण सभागृहात गोंधळ झाला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला.
तेव्हापासूनच राज्यभरात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. अशातच पुण्यातील कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकावत निवृत्ती मागे घेण्याची मागणी केली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती बॅनरमार्फत केली आहे.
साहेब निवृत्त पदाधिकारी होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे, असा मजकूर पोस्टर्सवर लिहिण्यात आलाय.
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे साहेब, कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशा मजकुराचे बॅनर्स पुण्यात झळकावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष समीर उत्तरकर यांनी बॅनर्स लावले आहेत.