Pune: बद्रिनाथ ज्योर्तिमठ येथील शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लीन...
शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबद्रिनाथ ज्योर्तिमठ येथील परमाराध्य परमधर्माधिश अनंत श्री विभूषित उत्तराम्नाय ज्योतिष पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे मोठया उत्साहात मंदिरात स्वागत करण्यात आले श्रीं ना अभिषेक करुन शंकराचार्यांनी आरती देखील केली
यावेळी शंकराचार्यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील जाणून देखील घेतली
शंकराचार्य म्हणाले, भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत. पुराणे सांगतात, प्रत्येकजण आपल्या कर्माने आणि बुद्धीने पूजनीय होतात. ज्यांच्याकडे बुद्धी असते, यांच्याकडेच बल असते. शारिरीक बला पेक्षा बुद्धी बल वाढविण्याची गरज आहे.
श्री गणेशांनी नेहमीच बुद्धीचा वापर केला. त्यातूनच ते प्रथम पूजनीय झाले, अशी गणरायाची महती त्यांनी सांगितले. तसेच, दगडूशेठ गणपती मंदिरात येऊन खूप आनंद झाला. पुण्यार्जन करायचे असेल, तर या पुण्यनगरीत यायला हवे, असे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले.
शताब्दी महोत्सवात द्वारका व ज्योर्तिमठाचे यापूर्वीचे पीठाधिश्वर जगद््गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे देखील मंदिरात दर्शनासाठी येऊन गेले होते. यामुळे आता चारही पीठाचे पीठाधीश्वर मंदिरात दर्शनासाठी येऊन गेले आहेत.
बद्रिनाथ ज्योर्तिमठ येथील परमाराध्य परमधर्माधिश अनंत श्री विभूषित उत्तराम्नाय ज्योतिष पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद:सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे मोठया उत्साहात मंदिरात स्वागत करण्यात आले
श्रीं ना अभिषेक करुन शंकराचार्यांनी आरती देखील केली