Ajit Pawar Net Worth: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नेमकी किती संपत्ती? जाणून घ्या
गेल्या पाच वर्षांच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. पवार यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून हे स्पष्ट झाले आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या स्थावर मालमत्तेत 10 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App37 कोटी 15 लाख 70 हजार 29 रुपये स्थावर, तर 8 कोटी 22 लाख 60 हजार 680 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 27 कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जाहीर केली होती.
तसेच, 20 ठिकाणी जमीन, चार निवासी इमारती, एक व्यापारी संकुल इमारत, दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर अशी जंगम मालमत्ता असून, यंदा एका ट्रेलरची वाढ झाली आहे. तसेच संपत्तीमध्ये देखील वाढ झाली आहे प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे पवार यांच्याकडे सात लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम आहे.
2019च्या तुलनेत स्थावर मालमत्तेत 10 कोटी रुपयांनी वाढ होत 37 कोटी 15 लाख 70 हजार 29 रुपये इतकी स्थावर, तर आठ कोटी 22 लाख 60 हजार 680 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. पवार यांनी वैयक्तिक एक कोटी 7 लाख 92 हजार 155 रुपयांची विमा पत्रे, डाक बचतीत गुंतवणूक केली असून, 24 लाख 79 हजार 760 रुपयांचे शेअर, बंधपत्र (बॉण्ड), तर तीन कोटी 9 लाख 69 हजार 53 रुपयांच्या बँकांमध्ये ठेवी असल्याचे स्पष्ट केले आहे.
2019 मध्ये अजित पवार यांच्यावर वैयक्तिक एक कोटी पाच लाख रुपयाचे कर्ज होते ,तुलनेने यंदा कर्जात वाढ झाली आहे. 2014 मध्ये 4 कोटी 10 लाख 86 हजार 755 रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. तसेच सोने-चांदीबरोबर हिऱ्याचे दागिने वाढले आहेत.
अजित पवार यांच्याकडे सद्यःस्थितीला 38 लाख 1 हजार 532 किमतीचे सोने-चांदी आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, भेटवस्तू, चांदीच्या मूर्ती आणि हिल्याचे दागिने असल्याचे जाहीर केले आहे. तर 2019 मध्ये वैयक्तिक 13 लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने असल्याचे नमूद केले होते. ही वाढ दुप्पट आहे.