सुप्रिया सुळेंकडून फॅमिली फोटो शेअर, सुनेत्रा पवारही दिसल्या, पण अजितदादा मिसिंग!
दिवाळीनिमित्त बारामतीत पवार कुटुंब एकत्र आलेलं. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जेवणासाठी पूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुप्रिया सुळेंनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पवार कुटुंबियांच्या एकत्र फोटोमध्ये सुनेत्रा पवार दिसल्या, अजित पवार मात्र त्या फोटोंमध्ये कुठेच दिसले नाहीत.
या फोटोंमध्ये अजित पवार कुठे दिसले नाहीत, मात्र काटेवाडीतील धनी वस्तीला अजित पवारांनी भेट दिली.
राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला येत असताना, अजित पवार समर्थक आमदारांनीही शरद पवारांची भेट घेतली.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी शरद पवारांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. माझे वडील पवार साहेबांना भेटायला येत होते. मी सुद्धा सगळ्यांना भेटायला आलो आहे. यातून राजकीय अर्थ काढू नये. सगळे एकत्र राहायला पाहिजेत, असं अतुल बेनके म्हणाले.
मी अजित पवारांनी भेटायला जाणार आहे. अजित पवार इथे असायला हवे होते. पुन्हा सगळे आपल्याला एकत्र दिसतील, असा विश्वासही अतुल बेनके यांनी व्यक्त केला.
आजारपणातून सावरलेले अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांत हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, आता ते दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंदबागेत उपस्थित राहणार का? असा सर्वांच्या मनात प्रश्न होता. पण, गोविंद बागेत मात्र अजित पवार दिसले नाहीत, अशातच आता अजित पवार भाऊबिज तरी कुटुंबासोबत एकत्र साजरी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आज शरद पवारांच्या गोविंद बागेत आज दिवाळी पाडवा पार पडला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला.