Ajit Pawar At Katewadi: अजितदादांचा कुर्ता बघा, दिवाळीनिमित्त खास ड्रेस घालून किल्ल्यांची पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील धनी वस्तीला भेट दिली. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त काटेवाडीत तयार करण्यात आलेल्या किल्ल्यांची पाहाणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करताना पाहायला मिळतात. परंतु, अजित पवारांनी धनी वस्तीवर विनामस्क पाहायला मिळाले.
सार्वजनिक ठिकाणी डॉक्टरांनी मास्क घालायला सांगितलं, असं अजित पवारांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, काटेवाडीत ते विनामास्क दिसले.
अजित पवारांनी परवा बारामतीतील शारदोत्सवाला मास्क घालून हजेरी लावली होती. परंतु, अजित पवार काटेवाडीतील धनी वस्तीवर विनामास्कच किल्ला पाहायला गेले होते.
अजित पवारांनी काटेवाडीत सांत्वन भेट घेतली.
काटेवाडी येथील देविदास काटे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या घरी जाऊन अजित पवारांनी कुटुंबियांची भेट घेतली.
अजित पवारांचे वडील अनंतराव पवार आणि दिनकर काटे यांचे घनिष्ठ संबंध होते आणि त्या निमित्तानं अजित पवार हे कुमार काटे यांच्या घरी गेले होते.
आजारपणातून सावरलेले अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांत हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आता ते दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंदबागेत उपस्थित राहणार का? असा सर्वांच्या मनात प्रश्न होता. पण, गोविंद बागेत मात्र अजित पवार दिसले नाहीत, अशातच आता अजित पवार भाऊबिज कुटुंबासोबत एकत्र साजरी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आज शरद पवारांच्या गोविंद बागेत आज दिवाळी पाडवा पार पडला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला.