Sawai Gandharva Mahotsav Pune 2022 : संगीतप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व महोत्सावाला सुरुवात
संगीतप्रेमी पुणेकरांसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाला 14 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App14 ते 18 डिसेंबरदरम्यान यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव रंगणार आहे.
सवाई गंधर्व महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांच्या गायनाने होणार आहे.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी त्यानंतर आपली गायनकला सादर करतील.
तिसऱ्या दिवसाचा समारोप पद्मभूषण पं. अजॉय चक्रबर्ती याच्या गायनाने होईल.
68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरुवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या बहारदार गायनाने झाली.
महोत्सावाच्या दुसऱ्या दिवशी दिवंगत पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांचे बंधू तसेच ख्याल शैलीचे गायक पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा यांचे सहगायन झाले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला भेट देत भारतीय शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेतला.
दरम्यान त्यांनी पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा यांच्या गायकीचा आनंद घेतला.
यंदाच्या महोत्सवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी साजरी होत असल्याने एक वेगळीच झळाळी महोत्सवाला लाभणार आहे.