In Pics : पुणे बंदला उत्तम प्रतिसाद; मूक मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात बंदची हाक देण्यात आली आहे.

Continues below advertisement

pune bandh

Continues below advertisement
1/8
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात बंदची हाक दिली आहे.
2/8
त्यासोबतच मूक मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी निघालेल्या मूक मोर्चात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
3/8
खासदार छत्रपती उदयनराजे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, दीपक मानकर, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, मोहन जोशी, आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, संगीत तिवारी, अंकुश काकडे, रुपाली पाटील, अजित दरेकर, संजय बालगुडे, संतोष शिंदे, राजेंद्र कुंजीर, विकास पासलकर, चंद्रकांत मोकाट हे सगळे या मूक मोर्चात सहभागी झाले होते.
4/8
आज सकाळी 11 वाजता उदयनराजे यांच्या हस्ते डेक्कन जिमखाना येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मूक मोर्चास प्रारंभ झाला.
5/8
डेक्कन जिमखाना, टिळक चौक मार्गे लक्ष्मी रस्त्याने शगुण चौक, नगरकर तालीम चौक, बेलबाग चौक मार्गे लाल महालजवळ आला.
Continues below advertisement
6/8
लाल महालात मोर्चाचं रुपांतर सभेत होणार आहे. यात अनेक प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहेत.
7/8
या सगळ्या मोर्चासाठी 7000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक चौकात पोलीसांचा ताफा तैनात आहे. त्याशिवाय पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
8/8
राज्यपालांना हटवा, असं लिहिलेलं फलक हातात घेत अनेक संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे.
Sponsored Links by Taboola