Ashadhi Wari 2021 : पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान, पाहा फोटो
तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर आज (शुक्रवारी 2 जुलै) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाळखीचे प्रस्थान झाले. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानात कोरोनाचा शिरकाव प्रशासनाच्या खबरदारीने टळलाय. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
प्रस्थानापूर्वी एकामागोमाग एक वारकरी कोरोना बाधित झाले अन् प्रशासनाचे धाबे दणाणले होते. पण सर्वोत्तपरी खबरदारी घेऊन प्रस्थान सोहळा उत्साहात पार पाडण्यात प्रशासनाला यश आलं आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी 23 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात संख्या वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन सावध झाले. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला. आरटीपीसीआर रिपोर्ट आणि पास पाहूनच वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला गेला. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
बाहेरचा एक ही वारकरी मंदिर आणि इंद्रायणी काठी फिरकू दिला नाही. याच खबरदारीने मोठ्या उत्साहात निर्विघ्नपणे प्रस्थान सोहळा पार पाडता आला. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
आषाढी वारीचा सोहळा संपेपर्यंत ही चिंता कायम आहे. त्यामुळं वारकरी कोणताही अट्टाहास न करता, इथून पुढंही संयम बाळगतील असा विश्वास आळंदी देवस्थानला आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
प्रत्येक वर्षी लाखो वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा या ठिकाणी भरायचा. प्रत्येक दिंडी इथं आली की या इंद्रायणी नदीत स्नान करते. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
गर्दी टाळण्यासाठी पालखी मंदिरात ठेवली असून केवळ पादुका प्रदक्षिणासाठी बाहेर काढण्यात आल्या होत्या. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
प्रस्थान झाल्यानंतरही ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका 2 ते 18 जुलैदरम्यान देहू येथील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातच राहतील. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
वारीतील सर्व नित्य उपक्रम येथेच केले जाणार आहे. त्यानंतर 19 जुलै रोजी एसटीने या पादुका पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)
20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. (फोटो सौजन्य - विजय राऊत)