Ashadhi Wari 2021 : देहूत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, पाहा फोटो
यंदाच्या आषाढी वारीवर (Ashadhi Wari 2021) कोरोनाचे सावट आहे. याच सावटाखाली देहूत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज (1 जुलै) प्रस्थान झाले. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यावेळी उपस्थित होते. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
बाहेरुन एकही वारकरी देहूनगरीत येऊ नये, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं औरंगाबादच्या पैठणमधून प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान झाले आहे. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात. उन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात. परंतु, यंदा कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
प्रस्थान झाल्यानंतरही तुकाराम महाराजांच्या पादुका 1 ते 18 जुलैदरम्यान देहू येथील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातच राहतील. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
वारीतील सर्व नित्य उपक्रम येथेच केले जाणार आहे. त्यानंतर 19 जुलै रोजी एसटीने या पादुका पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
देहूमध्ये आज होणाऱ्या तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला एकूण 350 जणांना परवानगी देण्यात आली आहे. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काल (30) हा आदेश देण्यात आला. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
या पूर्वी परवानगी दिलेल्या 100 भाविकांसह जादा 250 भाविकांना परवानगी सोहळ्याला हजर राहण्याची परवानगी देण्यात आला आहे. (फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे)
फोटो क्रेडिट - अमोल गव्हाळे