दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये रणजित शिरोळेंचा सहभाग, 90 किलोमीटरची स्पर्धा साडे अकरा तासात धावून पूर्ण
राजकीय व्यक्तींना त्यांच्या व्यग्र जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला जमत नाही अस मानलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र मनसेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी हा समज खोटा ठरवलाय.
गेली अनेक वर्ष मॅरेथॉन रनर असलेल्या रणजित शिरोळेंनी नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड ही 90 किलोमीटरची स्पर्धा साडे अकरा तास धावून पूर्ण केली
स्पर्धेच्या आधी राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या दौऱ्यात सहभागी असताना देखील रणजित शिरोळेंनी डाएट आणि ट्रेनिंग न चुकवता कॉम्रेड स्पर्धा पूर्ण केली.
दक्षिण आफ्रिकेच्या जवानांच्या स्मरणार्थ भरवली जाणारी जगातील ही सर्वात जुनी व सर्वात मोठी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आहे.
या स्पर्धेत 20 हजार स्पर्धकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत 403 भारतीय स्पर्धक त्यामध्ये सहभागी झाले होते.
रणजित शिरोळेंकडे बघून इतर राजकीय नेत्यांनीही प्रेरणा घ्यायला हरकत नाही.