Pune News : कर्नाटकमध्ये सरकारने शालेय पाठ्यपुस्तकातून सावरकर आणि हेडगेवारांचे धडे वगळले, भाजप आक्रमक
कर्नाटक सरकारने शालेय पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे पुणे शहरातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आमचा आदर्श आहेत त्यांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही, असं भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक म्हणाले.
शालेय पाठयपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ केशव बळीराम हेडगेवार ह्यांचे धडे वगळून अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण केले आहे .
राहुल गांधी या खूश करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
कर्नाटक सरकारच्या या आदेशाविषयी शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे काय भूमिका मांडणार रोज सकाळी विविध वाहिन्यांवर आपले मत मांडणारे संजय राऊत हे याविषयी काय भूमिका घेणार हे त्यांनी स्पष्ट करावे.
भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून डॉ. हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धडे वगळण्यात आल्याबद्दल आंदोलन केले.
यावेळी कर्नाटक सरकारचा तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा निषेध करण्यात आला.