PHOTO : पुष्टिपती विनायक जयंती निमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव
गणरायाच्या विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी आणि स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. (Photo Credit : facebook/@dagadushethganpati)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. (Photo Credit : facebook/@dagadushethganpati)
या महोत्सवात तब्बल 500 शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. (Photo Credit : facebook/@dagadushethganpati)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांच्या हस्ते गणेश जन्माची पूजा आणि अभिषेक झाला. (Photo Credit : facebook/@dagadushethganpati)
वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने दूर व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी गणपतीला अर्पण करण्यात येतो. तसेच, दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार असल्याची माहिती ट्र्स्टकडून देण्यात आली आहे. (Photo Credit : facebook/@dagadushethganpati)
(Photo Credit : facebook/@dagadushethganpati)