Pune on Covid19 : पुण्यात लहान मुलांसाठी स्पेशल कोविड सेंटर, पालकांच्या राहण्याचीही सोय
पुण्यातील येरवडा अनोखं स्पेशल कोरोना चाईल्ड सेंटर सुरू करण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे कोविड सेंटर उभारलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे महापालिका आणि सेंट्रल फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टिव्हिटीच्या संयुक्त विदयमाने हे सेंटर सुरु करण्यात आले आहे.
छोटे बेड्स, भिंतीवर आकर्षक चित्र, वेगवेगळ्या खेळण्या, विशेष भोजन व्यवस्था, मनोरंजनाच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम या सगळ्यासोबत बालरोगतज्ञ आणि प्रशिक्षित मेडिकल स्टाफ याठिकाणी आहे.
लहान मुलांना भीती वाटू नये याकरता विशेष सजावट भिंतीवर करण्यात आली आहे.
लहान मुलांना आवडणारे मोठू-पतलू, छोटा भीमचे कार्टुन्सही भिंतीवर रेखाटण्यात आले आहेत. लहान मुलांकरता आनंददायी वातावरण येथे निर्माण करण्यात आले आहे.
या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 40 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोविड सेंटरमध्ये लहान मुलांच्या पालकांचीही राहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
ऑक्सिजन बेड, अॅम्ब्युलन्स 24 तास सेवा इथं देण्यात आलीय. लहान मुलांना वेगवेगळे चित्रपट दाखवण्याची व्यवस्था सुद्धा असून मुलांना कोणत्याही प्रकारे या संकटातून बाहेर काढण्याची तयारी येथे करण्यात आली आहे.