Pune Wagholi kesnand Accident : पुण्यात आलेल्या कामगारांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र! 9 जणांचा चिरडलं, 3 जणांचा मृत्यू
पुणे: वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ पुण्याकडून येणाऱ्या भरधाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने (Pune Dumper Accident) फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन चिमुकल्या मुलांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोर घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती समोर आली आहे.
केसनंद फाट्यावर फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली. फूटपाथवर एकूण 12 जण झोपले होते. तर बाकी फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते.
भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डंपर चालक क्रमांक MH 12 VF 0437 याने दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आहे.
आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड यास ताब्यात घेतला आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे.