Pune Weather: एक्स्प्रेस वेवर धुक्याची चादर; दाट धुक्यात रेल्वे मार्गही हरवला, लोणावळ्यातील धुक्याला भेदत रेल्वे धावली
राज्यात सर्वत्र थंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात चांगलीच हुडहूडी भरली आहे. तर मावळ थंडीने गारठला असून लोणावळ्यात पुणे मुंबई एक्स्प्रेस वे हरवला धुक्यात तर संपूर्ण मावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसह्याद्रीच्या पर्वत रांगेत घाट माथ्यावरील पट्टा धुक्यात हरवल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि आल्हाददायक धुकं यामुळे पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झाला आहे.
तर दुसरीकडे वाहनचालक गाडी चालवताना या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटत आहे. पुणे मुंबई लोहमार्गावरील रेल वाहतूक आज धीमी झाल्याचं चित्रं दिसून आलं.
आज पहाटेपासून मावळ तालुक्यावर धुक्याची चादर पसरली असून त्यामुळे द्रुतगती मार्ग असेल किंवा मुंबई पुणे लोहमार्ग दोन्हीही मार्गवरील वाहतूक धिम्यागतीने सुरू असून तालुक्यात प्रथमच दाट धुकं पडलं आहे.
अगदी पाच फुटांचे अंतर ही लवकर दिसून येत नाहीये, त्यामुळे या धुक्यातून वाट काढताना झुकझुक गाडीला ही सावधानता बाळगून आणि रेल इंजिनचे दिवे चालू करूनच लोणावळा पुणे दरम्यानचा प्रवास करावा लागत आहे.