Tourist Place In Pune: पावसाळ्यात भटकंतीला जाण्याचा विचार करताय? पुण्यातील या पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या
पावसाळा सुरु झाला की अनेक पर्यटक विविध पर्यटनस्थळांना भेट देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभुशी डॅम पुण्यापासून 73 किमी. अंतरावर आहे. पावसाळ्यात या धरण्यातील पाणी पाहण्यासाठी परिसरात पर्यटक गर्दी करतात.
सिंहगडावर ट्रेकिंगला जाणं आणि तेथील कांदा भजी आणि दह्याचा आस्वाद घेणं, ही पुणेकरांची आवडती गोष्ट आहे.
पावसाळ्यात सिंहगडावर असणारी हिरवळ, तेथील थंड वातावरण तुम्हाला नक्कीच आवडेल.
माळशेज घाटात पावसाळ्यात असणारी हिरवळ आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात जर वीकेंडला तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत आसाल तर तुम्ही माळशेज घाटात जाऊ शकता.
पुण्यातील खडकवासला धरण हे पुणेकरांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. खडकवासला धरणाच्या बाजूला असणाऱ्या चौपाटीमध्ये मिळणाऱ्या कणीस आणि भजीचा आस्वाद तुम्ही पावसाळ्यात घेऊ शकता.
पुण्यातील जांभूळवाडी तलाव येथे देखील तुम्ही पावसाळ्यात जाऊ शकता. जांभूळवाडी तलावाच्या परिसरात अनेक कॅफे आहेत. तिथे तुम्ही तलावाचा व्ह्यूव एन्जोय करत चविष्ठ पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
वेताळ टेकडी, कामशेत, मानसरोवर या पुण्यातील ठिकाणांना तुम्ही पावसाळ्यात भेट देऊ शकता.