मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पुण्यात, गेला पाण्यात; पावसाचे आगमन दणक्यात
पुण्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी पावसामुळे सगळीच दाणादाण उडाली होती. पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत होऊन अनेकाचं मोठं नुकसानही पावसामुळे झालं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता, 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं दिसून आलं. काही मिनिटांच्या पावसामुळे रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी साचले होते.
पुणे शहरातील हडपसर भागात मुसळधार पाऊस पडल्याने येथील भागात पाणी साचल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर पाणी फेरल्याचं चित्र निर्माण झालं.
येथील भागात श्रीराम शिल्पाच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री आले होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे कार्यक्रमस्थळी असलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसून आल्या.
पुण्यातील लाडकी बाहीण योजनेच्या कार्यक्रमांनंतर विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भेटी दिल्या. यावेळी, नाना भानगिरे यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या रामाच्या पुतळ्याच अनावरण त्यांच्याहस्ते करण्यात आलं.
मोहम्मद वाडीत प्रभू श्रीराम यांच्या शिल्पाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री आले, पण पावसामुळे कार्यक्रमस्थळी चांगलंच पाणी साचल्याचं दिसून आलं.
दरम्यान, पावसानंतरही मुख्यमंत्र्यांनी येथील पुतळ्याचे अनावरण करुन पुणेकरांशी संवाद साधला