Pune Rain: लेकरा-बाळांना कडेवर घेऊन बापाची पावसात पायपीट
पुण्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील एकता नगर परिसरात छातीपर्यंत पाणी साचलं आहे.
पाच सोसायट्यांमध्ये पाणी घुसलं आहे. एकता नगर परिसरात द्वारका, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.
परिसरात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोटीद्वारे बचावकार्य करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत.
अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरातही पाणी घुसलं आहे.
पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की वडिलांना त्याच्या मुलीला खांद्यावर घेऊन बाचवकार्य करावं लागलं आहे.
मुसळधार पावसामुळे धरणातील विसर्ग सुरू आहे. काल रात्री भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे.
अनेक जण आपल्या घरामध्ये अडकून पडले आहेत. अद्याप मुसळधार पाऊस कोसळत आहे.