पाणी वाहतंय की साबणाचा फेस? तिसऱ्या दिवशी इंद्रायणी नदी फेसाळली
वारकरी सांप्रदयाची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी आजही फेसाळली. कालच्या पेक्षा आज याचं प्रमाण अधिकचं वाढलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळी अधिवेशनात हाच मुद्दा लक्षवेधी ठरला, सत्ताधारी आमदारांनी थेट राज्य सरकारला धारेवर धरलं. तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला काय जाग येईना.
गेल्या सात वर्षांपासून ते केवळ कारवाईचा फार्स करण्यात धन्यता मानतायेत. पिंपरी चिंचवडमधील ज्या कंपन्या इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडतात, त्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरुये.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कानाडोळा करणाऱ्या राज्य सरकारचाही याला पाठिंबा असल्याचं दिसून येतंय का? अशी चर्चा सुरु आहे.
पिंपरी चिंचवडमधील अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्या इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडतात. त्यांचं हेच पाणी पवित्र गंगेला जीवघेणी बनवत चालले आहे. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा ही परिस्थिती उद्भवलेली आहे, त्यावेळीच झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग आलेली आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी याच मुद्द्यावरून राज्यसरकारला धारेवर धरलं. त्यावेळी महाराष्ट्र नियंत्रण मंडळाने यावर खुलासा केला. आम्ही सहा कंपन्या बंद केल्याचं, पिंपरी चिंचवड पालिकेला एसटीपी प्लांट अत्याधुनिक करण्याचं आणि अवैधरित्या चालणाऱ्या गोडाऊनवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं.
राज्य सरकारने सुद्धा या खुलाशावर डोळे झाकून विश्वास ठेवला. मात्र आज पुन्हा एकदा इंद्रायणी फेसाळली, त्यावेळी आम्ही यापुढची कारवाई करतो,असं स्पष्टीकरण दिलं. त्यामुळं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाईचा कसा करतो, हे सिद्ध झालं.