Pune News : पेट्रोल पंप बंद राहण्याची अफवा; मध्यरात्री पुणेकरांची पेट्रोल पंपावर भलीमोठी रांग!

हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या संपामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची बातमी पसरताच पुणेकरांनी पेट्रोल पंपावर चांगलीच गर्दी केली आहे.

पुण्यातील अनेक पेट्रोल पंपावर 500 मीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.
पेट्रोल मिळणार की नाही या भितीने अनेक पुणेकरांनी गर्दी केली होती.
मात्र पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील देखील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार आहे.
पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या बैठकीत एकत्रितरित्या हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरात पेट्रोल पंप सुरळीत सुरू राहणार आहे.
ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सर्व पेट्रोल पंप सुरु राहतील असं सांगितलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत, असं ते म्हणाले.