Pune News: पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबाच्या यात्रेची सांगता, भाविकांची मोठी गर्दी
पुरंदर तालुक्यातील वीर इथल्या श्रीनाथ म्हस्कोबाच्या यात्रेची सांगता झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यात्रेला लाखो भाविकांनी रंग अंगावर घेण्यासाठी गर्दी केली होती.
बुधवारी सकाळी 11 वाजता देवाच्या पालख्या आणि काठ्या देऊळ वाड्यात आल्यानंतर मंदिराला प्रदिक्षणा घालण्यात आली
यानंतर छबिण्याला सुरवात झाली. दुपारी दीड वाजता श्रीनाथ म्हस्कोबा मूर्तीवर रंगाचे शिंपण झाले.
त्यानंतर काठीवर शिंपण झाले आणि नंतर मंदिराबाहेर भाविकांच्या आंगावर रंगाचे शिंपण करण्यात आले.
यावेळी हा रंग अंगावर घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत अनेक कार्यक्रम होत असतात.
राज्याबरोबरच देशातील अनेक राज्यातून अनेक भाविक येत असतात.
वीर येथील यात्रेची सांगता मारामारीने होते.
मारामारी म्हणजे रंगांची शिंपण हा रंग अंगावर घेण्यासाठी भक्तांची जी मारामार होते त्यालाच मारामारी म्हटलं जातं.