Purandar : रंगांची शिंपण अन् लाखो भाविक; श्रीनाथ म्हक्सोबाच्या यात्रेची वाजत गाजत सांगता
पुरंदर तालुक्यातील वीर येथे सुरू असलेल्या श्रीनाथ म्हक्सोबाच्या यात्रेची आज दुपारी रंगाच्या शिंपणानंतर सांगता झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजच्या या यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावली. यावेळी यात्रेत उधळलेला रंग अंगावर घेण्यासाठी गर्दी केली होती.
सकाळी 11 वाजता देवाच्या पालख्या आणि काठ्या देऊळ वाड्यात आल्या यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. यानंतर छबिण्याला सुरूवात झाली.
पारी दीड वाजता श्रीनाथ म्हस्कोबा मूर्तीवर रंगाचे शिंपण झाले. त्यानंतर काठीवर शिंपण झाले आणि नंतर मंदिराबाहेर भाविकांच्या आंगावर रंगाचे शिंपण करण्यात आले.
यावेळी हा रंग अंगावर घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत अनेक कार्यक्रम होत असतात.
राज्याबरोबरच देशातील अनेक राज्यातून अनेक भाविक येत असतात.
वीर येथील यात्रेची सांगता मारामारीने होते. मारामारी म्हणजे रंगांची शिंपण हा रंग अंगावर घेण्यासाठी भक्तांची जी मारामार होते त्यालाच मारामारी म्हटलं जातं.