Pune News : पुणे टू गुजरात थेट सायकलने गाठणार; पुण्यातील जल्लोषात सायकल रॅलरीला सुरुवात
इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या शंभर सायकलिस्ट चा सहभाग असलेल्या 1200 किमी पुणे ते गुजरात राईडला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी लांब पल्ल्याच्या राईड आयोजित करण्याचे सलग तिसरे वर्ष असून यापूर्वी पुणे ते कन्याकुमारी पुणे ते गोवा पुणे ते हम्पी आणि आता पुणे ते सोमनाथ गुजरात आयोजन करण्यात आले.
निगडी भक्ती शक्ती येथून सुरुवात करण्यात आली.
उद्योजक अन्नारे बिरादार, सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आला.
बाराशे किलोमीटर प्रवासाचा मार्ग खालील प्रमाणे राहणार आहे,
पुणे - वसई - वलसाड - भरूच - स्टॅच्यू ऑफ युनिटी - वटामन - गोंधल - जुनागड - सोमनाथ - गीर अभयारण्य - गिरनार असा बारशे किलोमीटरचा प्रवास आठ दिवसांचा राहणार आहे.
यात सगळ्या वयोगटातील बाईक रायडर्सचा समावेश आहे.
मोठ्या उत्साहाने आणि शिवाजी महाराज की जय या जयघोषात सायकल रॅलीला सुरुवात झाली.