PHOTO : राज्याच्या सहाही विभागांतील धरणांमधील पाणीसाठा अवघा 66 टक्क्यांवर
यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या सहाही विभागांतील धरणांमधील पाणीसाठा अवघा 66 टक्क्यांवर आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत 21 टक्के जलसाठा कमी आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
आशा परिस्थितीत उन्हाळ्यापर्यंत तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील जलाशयांमध्ये गतवर्षी 87.10 टक्के पाणीसाठा होता. यंदा अवघा 66.31 टक्के पाणीसाठा आहे.
सद्यस्थितीला कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक 82.63 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 83.15 टक्के होता.
छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागात सर्वाधिक कमी 37.63 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या विभागातील धरणांमध्ये 87.31 टक्के पाणीसाठा होता.
नागपूर विभागात 71.78 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 79.49 टक्के पाणीसाठा होता.
अमरावती विभागात 75.62 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 91.52 टक्के पाणीसाठा होता.
पुणे विभागात 70.39 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 88.08 पाणीसाठा होता.
नाशिक विभागात 70.61 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 89.89 टक्के पाणीसाठा होता.
त्यामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा नसल्याने येथील शहरांमध्ये सुरू असणारी विकासकामे, बांधकामे, प्रकल्प, उद्योगधंदे, व्यवसायांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.