Pune News: पुण्यातील आळंदी म्हातोबाची परिसरात अफूची शेती; महिलेवर गुन्हा दाखल
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
15 Mar 2025 08:02 AM (IST)
1
आळंदी म्हातोबाची गावातील परिसरात अफूची शेती आढळून आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लोणी काळभोर पोलिसांनी अमली पदार्थाची लागवड केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
3
आळंदी म्हातोबाची येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या जमिनीवर अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली.
4
यावरून पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.त्यावेळी अफूच्या ६६ झाडांची लागवड केल्याचे आढळून आले.
5
या प्रकरणी शेतकरी महिलेवर (वय ४५, रा.आमराई वरती, आळंदी म्हातोबाची) लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6
पोलिसांनी या महिलेस ताब्यात घेतले आहे. लोणी काळभोर परिसरात यापूर्वी अफूची लागवड करणाऱ्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.