Vehicles Vandalized In Moshi: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच; मोशीत तीन वाहनांची तोडफोड, मोठ्या प्रमाणावर नुकसान, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच असल्याचं चित्र आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात झालेल्या वादातून दोन ते तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही घटना रात्री दहाच्या सुमारास मोशी येथे घडली आहे. अगदी किरकोळ कारणावरून वाहनांची तोडफोड केली जात आहे. मोशीमध्ये दोन गटात झालेल्या वादातून दोन ते तीन दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.
भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलेटच्या फाडफाड आवाजावरून हा वाद झाल्याचे प्रथमदर्शी पोलीस सांगत आहेत.
मोशीत दोन गटाच्या वादात तीन दुचाकींची आणि एक चारचाकी वाहनांची 10 ते 15 जणांनी तोडफोड केली आहे. मोशीत दोन गटाच्या वादाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके का वाजवतो, यावरुन वादाला तोंड फुटले अन् पुढं या वादातून वाहनांची तोडफोड झाली. रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
केएसबी चौकात काल दिवसा ढवळ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. तर काही तासांच्या अंतरात पुन्हा एकदा हा प्रकार घडला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायम ऐरणीवर आहे
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर वारंवार होणाऱ्या या तोडफोडीला नागरिक वैतागले आहेत.