Nitin Gadkari : नितीन गडकरींचा हवाई दौरा; चांदणी चौकातील कामाची केली हेलीकॉप्टरमधून पाहणी, पाहा फोटो...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे बंगळूरू अर्थात राष्ट्रीय महामार्ग 48 वरील पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील चांदणी चौक ते रावेत/किवळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत गडकरींनी अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली.
वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पूल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महामार्गाची दुरुस्ती करण्याचे निर्देश गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नितीन गडकरी चाकण एम आय डी सीतून पुण्यात येताना हेलिकॉप्टरमधून साडेचार वाजता चांदणी चौकातील कामाची पाहणी करणार होते.
मात्र ऐनवेळेस त्यांनी त्यात बदल करुन पुण्यातून चाकणला जाण्याआधीच चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली.
पुण्यातील चांदणी चौकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
त्यामुळे उद्या हा पूल पाडण्यात येणार आहे.
पूल पाडण्याआधी त्यांनी हवाई पाहणी केली आहे.