Pune News: पुण्यात भरली मोदींच्या नावाची बाजारपेठ; राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनोखं आंदोलन
'मोदींंनी काय दिलं? गाजर दिलं.. गाजर दिलं...', अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पुण्यात महागाई विरोधात आंदोलन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात महागाईने उच्चांक गाठला असून यावर्षी महागाईचा उच्चांक मोडीत काढला असून या आठवड्यात घाऊक महागाई दर 15.88 वर गेला आहे.
हा गेल्या 9 वर्षांतील उच्चांक असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही कठीण परिस्थिती देशावर ओढावली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात मोदी महागाई बाजार भरविण्यात आला होता.
पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात उभारण्यात आलेल्या भाजीपाला , फळे , फुलविक्रेता ,पुस्तक विक्रेता , शालेय साहीत्य , किराणा, चहा , वडापाव विक्रेता याचबरोबर मासळी बाजारासह “मोदी महागाई बाजार पेठची” चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवे सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेसह किरकोळ विक्रेत्यांना देखील बसला आहे.