Pune News : दीड लाखांहून अधिक किमतीचा अन् 45 किलोंचा रामायण ग्रंथ तुम्ही पाहिलाय का?
वाल्मिकी रामायणास भारतीय परंपरेत अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आजवर विविध माध्यमातून रामायण आपल्यासमोर आले आहे. आता हे महाकाव्य 10 खंड असलेल्या एका संचाच्या अद्वितीय रुपात आपल्याला वाचायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 1 लाख 65 हजार इतकी किंमत आणि 45 किलो असलेल्या अभूतपूर्व अशा या रामायणाची निर्मिती वेदिक कॉसमॉस या प्रकाशन संस्थेने केली आहे.
या विशेष रुपात सादर होणाऱ्या रामायणाचे प्रकाशन देशात पहिल्यांदाच पुण्यात झाले.
स्वरोस्की क्रिस्टलने सजवलेल्या या ग्रंथामध्ये, रामायणातील महत्वाचे प्रसंग 200 पेक्षा जास्त चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
हे भव्य पुस्तक वाचण्याची सोय असलेल्या विशेष लाकडी पेटीसह हा ग्रंथ वाचकांना मिळणार आहे.
एकूण दहा पुस्तकांचा संच असलेल्या या ग्रंथाच्या निर्मितीसाठी पर्यावरणपूरक आणि उच्च प्रतीच्या साधनांचा वापर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर पुस्तक संचासाठी डिझाईन करण्यात आलेला विशेष लाकडी बॉक्स, रामायणातील महत्वाच्या प्रसंगावर आधारित 200 हून अधिक उत्कृष्ट चित्रे आणि मौल्यवान स्वरोस्की क्रिस्टल्सची सजावट ही या ग्रंथाची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.
वाल्मिकी रामायणाच्या सात खंडातील 24,000 मूळ संस्कृत श्लोकांबरोबरच हिंदी आणि इंग्रजीतील भाषांतर देखील यामध्ये देण्यात आले आहे. सुरूवातीला ही प्रत व्हिनस स्टेशनरी येथील शॉपमध्ये मिळणार आहे.