Pune news : शिवाजी महाराजांचा पराक्रम अन् पुण्याच्या इतिहासाची साक्ष देणारं शिवाजीनगर मेट्रो स्थानक, पाहा फोटो
पुण्यातलं पहिलंवहिलं भूमिगत मेट्रो स्थानक असलेल्या शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. हे स्थानक येत्या काही दिवसांतच प्रवाशांना खुलं होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि पुण्याच्या इतिहासाची साक्ष देणारं स्थानक म्हणून शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची ओळख निर्माण होईल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा इतिहास हा पुणे शहराशी निगडित आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुणे पावन झालं आहे.
त्यात पुण्यातल्या शिवाजीनगर परिसराला महाराजांच्या नावानं एक वेगळी ओळख मिळाली आहे.
हा सगळा इतिहास लक्षात घेऊन शिवाजीनगर मेट्रोचे स्थानकाची बांधणी करण्यात आली आहे.
या स्थानकाची वास्तू ही इतिहासकालीन वाड्यासारखी बांधण्यात आली आहे.
या स्थानकाच्या परिसरात जुन्या काळातल्या नदीवरचे घाट, मेघडंबरी आणि दीपमाळही बांधण्यात आली आहे.
पुण्यातील मेट्रो मार्गाचं काम पूर्ण व्हायला अजूनही बराच काळ आहे. पण शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची वैशिष्ट्यं लक्षात घेता ते पुणेकर आणि पर्यटकांसाठी नक्कीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.