Pune News: रम्य ते बालपण! तोच गणवेश अन् तीच शाळा; नुमवी शाळेत भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
आम्ही नूमवीय आणि नूमवि शाळेच्या 1997 च्या रौप्य महोत्सवी बॅचतर्फे माजी विद्यार्थ्यांची एक दिवसाची शाळा भरवण्यात आली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये नूमविच्या 1950 ते 2013 पर्यंतच्या बॅचचे सुमारे 850 ते 900 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
शाळेतील माजी आणि आजी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे तास घेतले.
राष्ट्रगीत, प्रार्थना, मधली सुट्टी आणि अभ्यासाच्या दोन तासासह ही एक दिवसाची शाळा माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात घेऊन गेले.
या आठवणी अधिक संस्मरणीय करण्यासाठी मधल्या सुट्टीत वडापाव, चन्यामन्या बोरं, गोळ्या, चिक्या, चहा, यांचा आस्वाद घेतला.
त्याचबरोबर सेल्फी पॉईंट आणि जुन्या आठवणींचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं आहे.
नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील कलावंत, शिक्षण क्षेत्रातील गुरूतुल्य व्यक्तीमत्व, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी असे विविध क्षेत्रातील दिग्गज माजी विद्यार्थांनी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या अभिनव कार्यक्रमात नूमविचे माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आम्ही नूमवीय तर्फे करण्यात आले आहे. शाळेचा गणवेश आणि बॅग घेऊन सगळे शाळेत वेळेवर पोहचले होते.