Pune News : सवाई गंधर्व महोत्सवात शॉर्ट सर्किटमुळे आगीची घटना; प्रेक्षकांची तारांबळ, किरकोळ आग असल्याने मोठी दुर्घटना टळली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Dec 2023 06:07 PM (IST)
1
पुण्यात सुरु असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात आगीची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटोगॅलरी असलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे.
3
कार्यक्रम सुरु असताना आग लागल्यानं कार्यक्रमात प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
4
आजचा या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.
5
शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग होती. काही वेळ प्रेक्षक घाबरलेल्या अवस्थेत होते.
6
मागे बसलेल्या प्रेक्षकांनी मंडपाच्या बाहेर धाव घेतली. पं. सुहास व्यास यांच्या गायन संपलं होतं.
7
त्यानंतर काही वेळ ब्रेक होता. यादरम्यान ही आग लागल्याची माहिती आहे.
8
मात्र फार मोठी आग नसल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवलं आणि कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आला.