सोन्याची जेजुरी! देवाच्या गडावर फळांची आणि फाराळाची आकर्षक आरास; भाविकांची अलोट गर्दी
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे. यानिमित जेजुरी गडावर भाविकांनी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेव दिवाळी असल्याने देवाला फळांची आणि फराळाची आकर्षक आरास करण्यात आली आहे. या केलेल्या आरासीला भोग असे म्हणतात.
देव दिवाळीला फळांची आणि फराळाची आरास देवाला केली जाते.
देवाला ही आरास पुण्यातील खंडोबा भक्त अक्षय क्षिरसागर यांच्या वतीनं फळांची आणि फराळाचा भोग चढवण्यात आला असल्याचं पुजारी यांनी सांगितलं.
आजचा चंपाषष्ठीचा पाचवा दिवस आहे. चंपाषष्ठीच्या काळात राज्यभरातून भाविक खंडोबा चरणी लीन होण्यासाठी येत असतात.
करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारतींच्या हस्ते चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा, म्हाळसा देवींच्या उत्सव मूर्तींची घट स्थापना झाली.
मार्गशीर्ष प्रतीपदेपासून सहा दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो.
आश्विन महिन्यात दसऱ्याच्या वेळी देवीचे नऊ दिवसाचे नवरात्र असते तर खंडोबाचे नवरात्र सहा दिवसांचे असते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टीपर्यंत होणाऱ्या उत्सवाला देव दीपावली म्हणले जाते. याला स्कंद षष्ठी असेही म्हणतात.
श्री खंडोबा मंदिरामध्ये उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी केले जात आहेत, दररोज वाघ्या मुरळी गोंधळी स्थानिक कलावंत गडावर गाणी म्हणून हजेरी देतात .पुजारी सेवक अन्नदान मंडळातर्फे दररोज दहा हजार भाविकांना मोफत पंचपक्वान्नाचे भोजन देण्याची व्यवस्था केली आहे. खंडोबाच्या ऐतिहासिक गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सारा गड उजळला आहे.