Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune news : आजी आजोबांसोबत दांडियाच्या तालावर थिरकली दिव्यांग मुले, पाहा फोटो...
नगाड़ा संग ढोल बाजे...ढोलिडा... ‘उड़ी उड़ी जाए'... पंखीडा... रंगीलो म्हारो ढोलना या गाण्यांवर थिरकत दृष्टीहिन आणि विशेष मुलांनी दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करत त्यांच्यासोबत या मुलांनी मनसोक्त दांडिया खेळण्याचा आनंद घेतला.
निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने पद्मावती रामकिसन बिहानी यांच्या विशेष सहकार्यातून दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी विशेष दांडिया कार्यक्रमाचे आयोजन कर्वेनगर मधील मातोश्री वृद्धाश्रमात करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ उद्योजक सुनील बिहानी, मंदाकिनी बिहानी, गिरीश बिहानी, प्रिया बिहानी, आरुष बिहानी, अनिल बिहानी यावेळी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा 10 वे वर्ष आहे.
माई बाल भवन वस्तीगृहातील दृष्टीहिन आणि विशेष मुलांनी उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमात निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने माई बालभवन वसतीगृहाला उपयुक्त ठरेल असे स्पीकर आणि माईक भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी मुलांना खाऊ आणि दसऱ्यासाठी गोड मेजवानी मेजवानी देखील देण्यात आली.
सुनिल बिहानी म्हणाले, नवरात्रीमध्ये दांडिया खेळण्याचा आनंद सगळ्यांनाच घ्यावासा वाटतो. विशेष मुलांना हा आनंद देण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्था दरवर्षी पुढाकार घेत असते ही अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे.
समाजातील या मुलांना दांडिया खेळताना पाहणे हे खऱ्या अर्थाने उत्सवाचा आनंद लुटल्यासारखे आहे. या मुलांना घेऊन शनिशिंगणापूर आणि शिर्डी या देवस्थानाची सहल लवकरच नेऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.