Jejuri Khanda : सोन्याच्या जेजुरीत 'मर्दानी दसरा' 42 किलोंची तलवार उचलण्यासाठी स्पर्धा!
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मैदानी दसऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला पानसे लसरदारांनी दिलेली बेचाळीस किलो वजनाचे खंडा म्हणजेच तलवार. याच तलवारीला घेऊन जेजुरी गडावर वेगवेगळ्या कसरती केल्या जातात.
एका हाताने ही तलवार तोलून धरली जाते तसेच त्याचबरोबर दातात धरून ही तलवार तोलून दिली जाते. तलवारी बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती केल्या जातात.
42 किलो वजनाची तलवार असल्यामुळे ही तलवार उचलना देखील अवघड असतं आणि अशा परिस्थितीमध्ये या तलवारीला घेऊन कसरती केल्या जातात.
जेजुरी आणि परिसरातील तरुण या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात.अनेक भाविक ही स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात.
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हीच खंडा स्पर्धा मंदिराच्या समोरील प्रांगणात घेतली जाते.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावात खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे.
उंच डोंगरावर असलेल्या कडेपठारावर खंडोबाचे जुने स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. त्यालाही आता तीन शतकं उलटून गेली आहेत.
जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत देवस्थान समजले जाते.मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी आणि इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत आहे.
खंडोबाच्या यात्रा आणि जत्रा या चैत्र, पौष तसंच माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवस, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात.