Pune Fire : साळुंके विहारमधील एमएनजीएल पाईपलाईनला भीषण आग; कार जळून खाक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2023 02:04 PM (IST)
1
पुण्यातील कोंढवा खुर्द येथील साळुंके विहार रोडवरील नाला पार्कजवळील MNGL (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) पाईपलाईनमधून वायू गळती झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यामुळे भीषण आग लागली आहे.
3
आग झपाट्याने पसरल्याने रहिवाशांमध्ये आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होत.
4
अग्निशमन दलाच्या जवानांना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली होती.
5
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
6
सध्या आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
7
आगीने एवढे मोठे रौद्र रुप धारण केले की, बाजून उभी असलेली एक कार जळून खाक झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे आजूबाजूच्या परिसराला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.