Pune Crime news : पुण्यातील तीन 'भाईंची' पोलिसांनी काढली धिंड
फरासखाना पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या गुडांची धिंड काढली. त्यांनी दहशत माजवलेल्या परिसरात त्यांना हातात बेड्या घालून फिरवण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 9 जुलै रोजी कसबा पेठेतील कमला नेहरु रुग्णालय परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.
गुन्हा दाखल होताच ऋतीक राजेश गायकवाड, उजेर शाहिद शेख आणि अरमान इकबाल शेख यांचा तात्काळ शोध घेऊन दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.
अटक आरोपीनी दहशत माजवलेल्या कसबा पेठ, कमला नेहरु हॉस्पीटल भागात त्यांची धिंड काढुन लोकांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, उप आयुक्त संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संतोष शिंदे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, संदीप कांबळे, समीर माळवदकर, सुमित खुट्टे यांच्या पथकाने केली आहे.
पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुणे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे.