Ajit Pawar : आता एकच इच्छा, दादा मुख्यमंत्री व्हा; पुण्यात बॅनरबाजी
पिंपरी-चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे अजित दादा तुम्ही लवकर मुख्यमंत्री व्हा, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यासोबतच पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर उर्से टोलनाक्यावर 15/250 फुटाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दादांचीच हवा असल्याचं दिसत आहे.
अजित पवार यांनी बंड करुन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं अनेक नेत्यांना वाटत आहे. अनेक नेत्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली आहे.
त्यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे बॅनर लावण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगू लागली आहे.
बंड करण्यापूर्वी अनेकदा अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अनेक कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात वक्तव्य देखील केली होती. त्यावेळी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा राज्यभर झाली होती.
मात्र बंडानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यासोबतच राज्याचं अर्थमंत्री पद देण्यात आलं आहे.
अर्थमंत्रीपद मिळाल्यावर लवकर अजित पवार तुम्ही मुख्यमंत्री व्हा, अशा आशयाचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.