In Pics : यळकोट यळकोट जय मल्हार! अडीच हजार मेंढरांचं खंडेरायाला रिंगण
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर बाळूमामांच्या मेंढरांचा दिंडी सोहळा पोहचला .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुमारे अडीच हजार मेंढरांसहित भाविकांनी श्री खंडोबा मंदिराला वाजतगाजत तीन प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले.
यावेळी भाविकांनी मेंढरावर भंडारा उधळून येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष करून जल्लोष केला.
काही दिवसांपासून हो दिंडी सोहळा पुरंदर तालुक्यात आला असून जेजुरी जवळील कोथळे आणि धालेवाडी येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने या सोहळ्याचे स्वागत केले.
सकाळी 9 वाजता अडीच हजार मेंढरे , भाविक ,देवाचा अश्व जेजुरी गडावर आले. बाळूमामांच्या मेंढरासहित भाविकांनी वाजत गाजत भंडाराची उधळण केली.
येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष करीत श्री खंडोबा मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. मंदिरा समोरील कासवावर देवाची आरती करून भाविकांनी जल्लोष केला.
यावेळी संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण होतं.
अनेकांनी नतमस्कक होत जल्लोष केला.