Chandrakant Patil: शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी; चक्क फेसशिल्ड लावून कार्यक्रमाला हजेरी
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा शाईफेक होऊ नये म्हणून फेस शिल्डचा वापर केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफेस शिल्ड लावत ते पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाला हजर झाले आहे.
सकाळीच त्यांना सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी देण्यात आली होती.
त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी फेस शिल्डचा वापर केला आहे. त्यांच्या या फेस शिल्डची सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे.
दोन व्यक्तींनी फेसबुक पोस्ट करत ही धमकी दिली होती. त्यांच्यावर सांघवी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. मात्र दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याने शाईफेक होण्याची शक्यता होती. यामुळे चंद्रकांत पाटलांनी खबरदारी म्हणून फेस शिल्ड लावत उद्घाटन केलं.
'आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.' पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली होती.
ही फेसबुक पोस्ट करणाऱ्या विकास लोले आणि दशरथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरेने याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. विकास लोले हा चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा अध्यक्ष असल्याचा दावा ढोरे यांनी केला आहे.