Pune News : जेजुरीत राज्य शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम, पाहा फोटो
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार्यक्रमादरम्यान जेजुरीच्या विकासासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तर यावेळी 109 कोटींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
यामुळे जेजुरीत येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळणार असल्याचा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
तर या कार्यक्रमामुळे आतापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
आतापर्यंत एक रुपयात पिक विमा देण्याच्या योजनेला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
या कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देखील प्रत्यु्त्तर दिले आहे.