Pune Rain : पुण्यात आभाळ फाटलं, सिंहगड रोड परिसरात छातीपर्यंत पाणी, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवल्या
पुण्यात रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे (Pune Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील अनेक भागांत अक्षरश: छातीपर्यंत पाणी भरलं आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) 5 सोसायट्यांमध्ये पाणी घुसलं आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.
नागरिकांच्या घरात पाणी घुसलं असून घरातील सर्व सामान पाण्याखाली गेलं आहे. घरात पाणी घुसून गाद्या भिजल्या आहेत, तर अनेक सामान पाण्यासोबत वाहून गेलं आहे.
नागरिकांना सुखरुप घरातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी दाखल झाल्या आहेत.
पुण्याचे रस्ते जलमय झाले असून गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला, यामुळे मुठा नदी पात्र देखील फुल्लं झालं आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता धरणातून पाणी सोडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील अनेक रस्त्यांना पुराचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळतंय.
पुणे शहराच्या सखल भागात प्रचंड पाणी साचलं आहे. सोसायट्यांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरलं आहे.
नागरिकांनी दक्षता बाळगावी, असं आवाहन पुणे प्रशासनाने केलं आहे.
जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अनेक नागरिक घरात साचलेलं पाणी उपसताना दिसत आहेत.