आज गुरुपौर्णिमा, आणि 'हा' आपला गुरू; भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांनी सांगितलं कोण?
देशभरात आज गुरुपौर्णिमा साजरी होत असून प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रातील गुरुंचे स्मरण करुन अभिवादन करत आहे. सोशल मीडियातून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर, भाजपच्या अधिवेशन मेळाव्यातही फडणवीसांनी आपला गुरू सांगितला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या भाषणाची सुरुवातच गुरुपौर्णिमेचा उल्लेख करत केली. आज गुरू पौर्णिमा आहे आणि आपला गुरु आहे भगवा ध्वज. या भगव्या ध्वजाला मी अभिवादन करतो, वंदन करतो.
हा भगवा ध्वज शिवाजी महाराजांचा आहे आणि हिंदुत्वाचा आहे. हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे, भारतमातेचा, अखंड भारताचा हा भगवा ध्वज आहे.
आता चातुर्मास सुरू होत आहे, आपल्याला माहिती आहे, चातुर्मास म्हणजे तपश्चर्या. आपल्याला आता संपर्क आणि संवाद वाढवायचा आहे. आपणासही समर्पणाचा मास म्हणून चातुर्मास साजरा करायचा आहे.
या राज्यात महायुतीचे सरकार निवडून येईल आजची तारीख लिहून ठेवा. या पावन भूमीत 2013 ला इथेच आपल अधिवेशन झालं होतं, आणि 2014 ला आपल सरकार आले.
2024 च्या निवडणुकीत जनता आपल्या पाठीशी असेल, 2024 ची निवडणूक आपण चार लोकांच्या विरोधात लढत होतो फेक नरेटीव्ह सोबत आपण लढत होतो. केवळ, 0.३ टक्क्यांनी आपल्या जागा कमी झालेल्या आहेत,असेही फडणवीसांनी म्हटले.
आपल्याला आता थोडी मेहनत करण्याची गरज आहे,आता फेक नरेटीव्हला उत्तर देणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवली, पण एक खोटा नरेटीव्ह तयार केला की हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार
खोटं फार काळ टिकत नाही, खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली आहे. विधान परिषदेत आम्ही टाचणी लावलीय, हे म्हणत होते महायुतीचे आमदार फुटणार अरे तुमचे 20 कधी फुटले हे तुम्हाला कळले नाही, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीतील विरोधकांना लक्ष्य केलं.