Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
मुंबई, पुण्यात सर्वच मानाच्या गगणपीत बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांची पर्वणी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशभक्तांनी आज सुट्टी घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला आहे, गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
गुलालांची उधळण आणि फुलांच्या पायघड्या घालून गणपती बाप्पांचे चौकाचौकात स्वागत केलं जातंय, या स्वागतासाठी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून येते.
पुण्यातील विसर्जन मिरवणूक मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीच्या अनुयायांनी आपली रांगोळी कला सादर केली आहे. या रांगोळी कलाकारीतून त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.
पुणे शहरातील वास्तव त्यांनी या रांगोळीतून समोर आणलंय, यंदा व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईवर आधारित रांगोळी राष्ट्रीय कला अकादमीनं साकारली आहे.
गेल्या 25 वर्षापासून पुणे शहरातील राष्ट्रीय कला अकादमी ही विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक विषयावर आधारित रांगोळ्या साकारून प्रबोधनाचे काम करीत आहे
पुण्यातील अलका टॉकीज चौकात ही भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली असून 100 फूट लांब आकाराची ही रंगोली काढण्यात आली आहे आहे.
विविध रंगानी सजलेल्या या रंगोलीसाठी तब्बल 300 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. तर, 250 रंगोली कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता