कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू झाली आहे. यावेळी, वंदे भारतच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत 16 सप्टेंबर म्हणजेच आजपासून धावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील तीन वंदे भारत ट्रेनला हिरवी झंडी दाखवली. त्यानंतर, पुण्यातून हुबळीसाठी आणि कोल्हापुरातून पुणेसाठी वंदे भारत ट्रेन सुटली
गेल्या आठवडाभरापासून पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर थांबा झाल्यानंतर वाद वाढला होता. त्यानंतर कोल्हापूर सांगलीसह कर्नाटकमधील लोकप्रतिनिधी तसेच प्रवासी संघटनांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दिला.
हुबळी ते पुणे वंदे भारत बुधवार, शुक्रवार व रविवारी पहाटे 5 वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. तर पुणे ते हुबळी गुरुवार, शनिवार व सोमवारी दुपारी सव्वा दोनला सुटेल रात्री 10.45 वाजता हुबळीत पोहोचेल.
वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर स्थानकावर दाखल होताच कोल्हापूरकरांना वंदे भारत एक्सप्रेस सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना आज कोल्हापूर स्टेशनवर प्रवाशांनी सेल्फी घेऊन ते आनंदाचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपले. यावेळी, प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.
कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत गुरुवात, शनिवारी आणि सोमवारी सकाळी 8.15 वाजता कोल्हापुरातून निघणार आहे. तर, त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता ही ट्रेन पुण्यात पोहोचते.
image 8