In Pics : पुणे पोलिसांनी एक, दोन नाहीतर तब्बल 150 कोयते केले जप्त
मागील काही (Koyta gang)दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी थेट कोयता विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील भोरी आळी या परिसरात अनेक लहान-मोठे दुकानं आहेत. याच परिसरातील दुकानावर छाटा टाकला आहे
दुकानातून नवीन विक्रीसाठी ठेवलेले 105 कोयते जप्त केले. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पुण्यात सर्रास कोयते उगारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गॅंगची दहशत सर्रास सुरु आहे. शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगरात तरुणांकडून भरदिवसा कोयते उगारले जात आहेत.
या तरुणांमध्ये अनेक अल्पवयीन तरुण असून गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांमध्ये भीती पसरली आहे.
यते उगारले जात आहेत. या तरुणांमध्ये अनेक अल्पवयीन तरुण असून गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांमध्ये भीती पसरली आहे. सामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी लुटण्याचे प्रयत्न देखील या तरुणांकडून केले जात आहेत.
मात्र पुणे पोलिसांकडून कुठलीही कठोर कारवाई या तरुणांवर केली जात नसल्याचं चित्र प्रखरतेने जाणवत आहे. शहरात अनेक परिसरात कोयता गॅंगने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे यावर पोलीस कारवाई कधी करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता.