In Pics : जी-20 च्या परिषदेसाठी पुणं सजलं!
पुण्यात जी-20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने शहरात वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी सुरु आहे. वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी काही मार्गावर सुशोभीकरण करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्ते आणि पादचारी रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे. त्यासोबतच रस्त्यांवरील दिव्यांची पाहणी केली जात आहे.
काही अंतराच्या कामासाठी नोडल अधिकारी नेमला आहे. त्यासोबतच यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे,
शहरातील प्रत्येक परिसरात मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरण सुरु आहे.
जी -20 परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधींच्या स्वागतासाठी तसेच शहर सौंदर्यीकरण आणि अनुषंगिक विकासकामांची तयारी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आहे अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी प्रशासनाचे कौतुक केलं.
37 देशातील 150 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार असल्याने सुरक्षाविषयक तसेच शिष्टाचारासंबंधी सर्व काळजी घ्यावी. पुणे, महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणूकीची क्षमता संपूर्ण क्षमतेने प्रदर्शित करावी, असं चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
या परिषदेत लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सायक्लोथॉन आणि स्वच्छचा मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं.
जी -20 परिषदेसाठी शहरात कुठेही पूर्णपणे वाहतूक बंद राहणार नाही आहे. मात्र विमानतळ ते सेनापती बापट मार्गावर मेट्रोचं काम बंद राहणार आहे. आवश्यकतेनुसार शहरातील वाहतूकीत बदल करण्यात करण्यात येणार आहे.