Pune Bandh : कुमठेकर रस्त्यावरही शुकशुकाट; पाहा पुणे बंदचे पडसाद!
राज्यपालांविरोधात आज पुणे बंदची हाक दिली आहे. त्याचबरोबर मुक मोर्चादेखील आयोजित करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी झाले आहे.
पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे.
गणेशोत्सव मंडळांनी पाठिंबा दिल्याने प्रमुख गणेश मंदिरे बंद राहणार आहेत.
पी एम पी एम एल ही सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद राहणार आहे.
विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सर्व दुकाने तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
पुण्यातील गजबजलेला रास्ता असलेल्या कुमठेकर रोडवरही आज बंदचे परिणाम पाहायला मिळत आहे.
कुमठेकर रस्त्यावर अनेक कपड्यांची आणि प्रिंटिंगची दुकाने आहेत.
ही सर्व दुकाने सकाळपासून बंद दिसून येत आहेत. राज्यपालांविरोधात असलेल्या या बंदला पुणेकरांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.