Pune : 'पॅरासाईट' म्हणून राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुणे विद्यापीठाकडून कारवाई, अंथरुण-पांघरुणासह विद्यार्थ्यांचं गेटवर आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात पॅरासाईट म्हणून अनधिकृत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलीय.

pune savitribai phule university pune

1/8
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात पॅरासाईट म्हणून अनधिकृत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलीय.
2/8
या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आलंय.
3/8
मात्र या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरु करण्यात आलंय.
4/8
कारवाई झालेले हे विद्यार्थी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर अंथरुन- पांघरून घेऊन आलेत.
5/8
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
6/8
मात्र ज्यांना वसतीगृह मिळालंय अशा विद्यार्थ्यांबरोबरच ज्यांना वसतीगृह मिळालेले नाही असे विद्यार्थी देखील बळजबरीने राहतात.
7/8
अशा पद्धतीनं राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलीय.
8/8
यानंतर विद्यार्थी विद्यापीठाच्या गेटसमोर बसले आहेत. शिवाय तिथं घोषणाबाजीही सुरु आहे
Sponsored Links by Taboola